चिखलठाण येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय राज्य घटना‌ हि भारत देशाने अधिकृत रित्या स्वीकारली. २६ जानेवारी हा दिन प्रत्येक शासकिय, निमशासकिय कार्यलयात, शाळेत, अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषशेठ काळनर, उपसरपंच आबासाहेब काळनर, सामाजिक कार्यकर्त पत्रकार जमीर सय्यद, राहुरी तालूका पत्रकार शेख युनुस, गणेश काकडे, खेमनर बाळासाहेब, व शालेय विद्यार्थी, उज्जेल शेख, प्रगती काळनर, आशिया सय्यद, आमन सय्यद, आवेज शेख, भोसले या शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथील शिक्षक वर्ग हा फार मेहनती चिकाटीचा आहे, म्हणूनच येथील विद्यार्थी हे गायन, वकृत्व, कलेत स्पर्धेत, शिष्यवृत्तीत गांव, तालूका नव्हे तर जिल्ह्यात गाजलेले आहे. म्हणून येथील शाळेस माझा गांव माझी जबाबदारी यांच्या वतीने देश भक्त, क्रांतीकारक, समाजसूधारक यांच्या जीवनावरील आधारीत पुस्तके हि शालेय वाचनालयात देण्यात आली. यावेळी सूत्र संचालन काकडे राजाराम  तर मनोगत गाडेकर, सारोक्ते सर, आभार रोडे सर यांनी मानले.

यावेळी उपस्थित नरवडे मॅडम, बाचकर सर, नरसाळे सर, डोमाळे सर समस्थ ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून सध्या सुरू असलेल्या कोरोना लक्षात घेऊन मास्क, सेनिटायझर, सोशल डिस्टेंश, मास्क, सेनिटायझर आदि गोष्टी लक्षात घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या