राहुरी शहर/ अशोक मंडलिक : गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या शिक्षण पथकाने वार्षिक तपासणी निमित्त जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळा कोंढवड येथे नुकतीच भेट दिली आहे.
या पथकाने भेटीदरम्यान कोंढवड शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी च्या वर्गाची गुणवत्ता तपासली व शाळेत राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शाळा तपासणी दरम्यान या पथकाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या पथकामध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख रवींद्र थोरात, सहाय्यक केंद्रप्रमुख श्री. उदमले, श्री गुलदगड, श्री. तांदळे, श्री उजागरे, श्री खेमनर तसेच शिलेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे मॅडम, श्री शेळके आदींचा समावेश होता.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजीराव औटी, मुख्याध्यापिका सौ. खराडे मॅडम व शिक्षक वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या