अहमदनगर येथे ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक संपन्न

राहुरी : अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामीण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर, एस. आर. बी. न्युजचे संतोष बोरूडे, राज्य सरचिटणीस राजेंद्र उंडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

राहुरी तालुका संघटकपदी प्रशांत जोशी यांची तर राहुरी तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रय जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सतीष टेमक, सतिष चक्रे, रजनीताई शेट्टी, रजनीताई ताठे, जयश्री काळे, दत्तात्रय जगधने हे मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या