विद्यार्थ्यांनी घेतली निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

लोणी - लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे १२ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात करण्यात आला. तसेच महाविद्यालयात मतदार जनजागृती पंधरवाडा आयोजित होत असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.

दि. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या ६१ व्या वर्षी म्हणजेच २५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतीभाताई पाटील यांनी मतदान प्रक्रिया सर्वसमावेशक आणि त्यात गुणात्मकपणे सहभाग असावा यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याची सुरवात केली. आज राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतभर साजरा केला जातो. लोकशाहीतील प्रत्येक घटकात मतदान करण्याविषयी आणि लोकशाहीविषयी जागरूकता व्हावी या उद्देशाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील रासेयोचे संचालक डॉ.महावीरसिंग चौहान आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या संकल्पनेतून निवडणूक साक्षरता मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे दि.२५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत विविध वेबसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने, ऑनलाईन स्पर्धा आणि विशेष दिनांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कोरोनाच्या वाढत्या धर्तीवर ऑनलाईन आणि अंतिम वर्षाचे उपस्थित विद्यार्थ्यांसहित सामाजिक अंतर पाळून ऑफलाईन पद्धतीने देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेण्यात आली. तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी लोकशाहीत मतदान आणि युवकांचा सहभागा बद्दल असणारे महत्व विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांना पटवून दिले. कु.राणी माने हिने शपथवाचन केले.

याप्रसंगी क्रीडा अधिकारी प्रा.सीताराम वरखड, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.महेश चंद्रे, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.मीनल शेळके, प्रा. मनीषा आदिक, प्रा.सारिका पुलाटे, प्रा.अमोल सावंत, प्रा.स्वप्नील नलगे, ग्रंथपाल सौ.सुजाता गुंजाळ आदी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच निवडणूक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष कु.हर्षल तांबे, उपाध्यक्ष कु. रुचा खैरनार, संयोजक कु.आदित्य जोंधळे, कु.अनुराग देशमुख आणि सर्व रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या