स.भु. प्रशालेत किशोरवयीन मुलींसाठी उदबोधन सत्र संपन्न


विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत बिडकीन येथे महाराष्ट्र शासनाच्या "जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन उदबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते.

या उदबोधन सत्राचे उदघाटन मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, बाबासाहेब सोकटकर ज्ञानेश्वर चाटुपळे, रजनी चिलवार, मंगला गायधने यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून करण्यात आले. 

यावेळी मंगला गायधने, वैशाली लोंढे, आरोग्य योगशिक्षिका श्रीमती देशपांडे मॅडम विद्यार्थीना मासिकपाळी व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिली. किशोरवयीन मुलीच्या विविध समस्या व प्रश्न यांना समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे आयोजन सुजाता तोष्णीवाल व वैशाली लोंढे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप सुजाता तोष्णीवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिकांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या