राहुरी / बाळकृष्ण भोसले - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारणाचा जो मूलमंत्र आम्हास दिला आहे या मुलमंत्रा वर व संस्कारावर चालत शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या विविध गावांमध्ये समाजहिताची कामे करून एक वेगळा आदर्श निर्माण करून हा मतदारसंघ राज्याच्या व देशाच्या पटलावर कसा चमकेल याकडे लक्ष दिले जात असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी चिंचोलीत ते बोलत होते. खा. लोखंडे यांच्या निधीतून हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या राहुरी तालुक्यातील चिंचोली, आंबी, करजगाव, बोरी फाटा आदी ठिकाणी सुमारे दीड कोटी निधी देऊन करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कामांमध्ये चिंचोली गाव येथील रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे २५ लक्ष रुपये, आंबी ते देवळाली प्रवरा रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण करणे ५० लक्ष रुपये, करजगाव नरसाळी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४० लक्ष रुपये, वांजुळपोई बोरी फाटा मांजरी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २५ लक्ष रुपये आदी कामाचा समावेश आहे.
यावेळी विविध ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी बोलताना खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाचा मुलमंत्र दिला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर व संस्कारांवर चालत आम्ही समाजहिताचे कामे करत आहोत. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामाचे फळ म्हणून उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कमी कालावधीमध्ये भारतात सर्वात चांगले काम महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाखाली केले. सामान्य माणसांचा विश्वास शिवसेनेने जिंकलेला आहे. कामे घेऊन येणाऱ्या सामान्य माणसांची कामे करण्याची खासियत शिवसेनेत असल्यामुळेच मी खासदारकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. कांद्याला कमीत कमी बाजारपेठेपेक्षा दोन रुपये भाव जास्त मिळावा यासाठी प्रकल्प उभारून या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये लवकरात लवकर हा प्लांट सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याच बरोबर उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी डायरेक्ट परवानगी मिळावी हाही प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास शेतकऱ्याच्या ऊसाला पाचशे रुपये अधिकचा भाव मिळू शकतो.
आमचे मालक जनता आहे. आम्ही कोणत्याही पुढारी यापेक्षा जनतेला जास्त महत्त्व देतो. सामान्यांची कामे करणे याकडेच मी लक्ष केंद्रित केलेले आहे. आम्ही निवडणुकीपुरते पक्षाचे आणि नंतर सर्व जनतेचे होतो. निळवंडे साठी आम्ही मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदार संघातील सुमारे शंभर शिव रस्ते दुरुस्त करून गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निधी मागितलेला आहे आणि तो त्यांनी देण्याचा कबूल केलेला आहे. त्यातूनही नागरिकांची मोठी समस्या दूर होणार आहे २०२४ साली आम्ही अनोळखी असताना आमच्यावर या मतदारसंघातील जनतेने विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही.
यावेळी चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे यांनी सांगितले की, खासदार लोखंडे यांचे राहुरी तालुक्यातील ३२ गावांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मोठा निधी या गावातील विकास कामांना त्यांच्या माध्यमातून मिळतो. आम्ही देखील नेहमी तुमच्या बरोबर राहू, तुम्हीच खासदार राहा मात्र विकासाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवा.
आंबी गावचे उपसरपंच विजय गोखले यांनी सांगितले की, आंबी सारख्या छोट्या गावाला खासदार लोखंडे साहेब यांनी मोठा निधी दिलेला आहे. आम्ही देखील निवडणूकीत भरभरून परत करून यातून उतराई होण्याचा प्रयत्न करू कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कोळसे यांनी यावेळी आंबी केटीवेअर दुरुस्त करावा. दशक्रिया विधी घाट मान द्यावा आंबी ते गांधी गिरणी रस्ता डांबरीकरण करावा अशा मागण्या खासदारांचा समोर ठेवतात त्यांनी त्या करून देण्याचा शब्द यावेळी दिला.
चिंचोली येथील कार्यक्रमास सरपंच गणेश हारदे, जालिंदर काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, मच्छिंद्र नलगे, सुधाकर पठारे, पांडू भाऊ लाटे, सुभाष काळे, शिवाजी जाधव, डॉक्टर पठारे, वेनूनाथ नलगे, सचिन लाटे, उपसरपंच विलास लाटे, गोपीनाथ वरपे, गणेश लाटे, शंकर नांन्नोर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबी येथील कार्यक्रमास मार्केट कमिटीचे संचालक वसंतराव कोळसे कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कोळसे, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार, अमळनेर सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब जाधव, आंबी सोसायटीचे माजी चेअरमन रावसाहेब सालबंदे, हरिचंद्र साळुंखे, उपसरपंच विजय डुकरे, अमळनेर चे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, विठ्ठल कोळसे, अशोक साळुंके, सुभाष डुकरे, भीमा कोळसे, विश्वनाथ जाधव, गणेश कोळसे, सुनील लोंढे, संदीप साळुंके, बापूसाहेब डुकरे, किसनराव साळुंके, शिक्षक सोसायटीचे संचालक संजय कोळसे, विष्णू जाधव, रवींद्र कोळसे, कोंडीराम साळुंके, दादासाहेब साळुंके, ॲड. सागर कोळसे,
करजगाव येथील कार्यक्रमांमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती वेणुनाथ कोतकर, सरपंच शरीफ पठाण, उपसरपंच गणेश कोतकर, बबन लोंढे, आप्पासाहेब केंद्रे, बाळासाहेब आरंगळे, दिगंबर कोतकर, इस्माईल पठाण, पंढरीनाथ कोतकर, नानासाहेब कोतकर, सुरेश कोतकर, अशोक कोतकर, बाबासाहेब कोतकर, आप्पासाहेब देठे, योगेश देठे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते तर बोरी फाटा येथील कार्यक्रमास योगेश पवार, भगीरथ पवार, योगेश जगताप, पांडुरंग जगताप, आप्पासाहेब देठे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना नेते शिवाजीराव जाधव, राहुल चोथे, सचिन लाटे, विठ्ठल कोळसे, अनिल खपके, बाबासाहेब बेंद्रे, लखन बोरुडे, योगेश पवार, भगीरथ पवार, श्रीधर जाधव, सुभाष चव्हाण, श्रीनिवास शिंदे, हरिभाऊ कोतकर, लक्ष्मण साळुंके आदींनी विशेष प्रयत्न केले. सर्वांचे आभार शिवाजीराव दिसागज यांनी मानले.
0 टिप्पण्या