अहमदनगर/ जावेद शेख : प्रेस क्लब च्या वतिने शिवाजीराजे पालवे यांना लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे हा सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी जेष्ठ नेते प्रतापकाका ढाकणे, सभापती गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुमित खेडकर, अधिकारी डाॅ जगदिश पालवे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, गटविकास अधिकारी सरपंच रंजित बेळगे, प्रा संपादक दादासाहेब खेडकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष कृष्णनाथ अंदुरेे, शिवाजीराव गर्जे, अमोल जावळे, समाजसेवक पोपटराव फुंदे आदि उपस्थित होतेे.
शिवाजीराजे पालवे यांनी अ नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांना एकत्रीत करून जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या माध्यमातुन जिल्ह्यातील आजी माजी सैनिक, शहीद परिवार व सामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळून देण्याचे काम करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 7 ते 8 हजार झाडांची लागवड करून संवर्धन करत आहेत. या मध्ये 3400 वडाची झाडांची लागवड केलेली आहे. कोल्हार येथे कोल्हुबाई गडावरील महादेव मंदीर परिसरात 500 वडाची झाडे भगवान शंकराच्या पिंडीच्या आकारात लावलेले असुन महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय वृक्ष असलेले गाव कोल्हार अशी ओळख तयार केली आहे. पुरस्काराने कार्य करण्यास प्रोत्सान मिळते व आणखी कार्य करण्यास उत्साह मिळतो.
0 टिप्पण्या