सर्व प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, जेष्ठ शिक्षक प्रफुल्ल कुलकर्णी, प्रा. चिंचाणे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता काळे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका मालती बिरारे यांनी वैष्णव जन तो तेने कहिये हे, तर श्रीमती जाफरी ए.एन व अनुराधा सरोदे यांनी साबरमती के संत तुने कर दिया कमालहे भजन सुमधुर आवाजात सादर केले. सायली सावंत, दिक्षा राठोड यांनी रघुपती राघव हे भजन अतिशय सुमधुर आवाजात सादर केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य यावर चौफेर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या समिक्षा काळे, आकांक्षा काळे , श्रुती भुकेले, वनिता साळुंके, साक्षी शिंदे ,शितल मात्रे, वैष्णवी बांडे, सिमा आतार, संध्या गायकवाड, सालेहा शेख, अनस, श्वेता निकम, प्रांजल आष्टीकर या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अभ्यासपूर्ण भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चाटुपळे, दिक्षा राठोड यांनी तर आभार महेश बहाळकर यांनी मानले.
0 टिप्पण्या