दहावीपर्यंत सोबत राहीलेले, सोबत खेळलेले वर्गमित्र दहावीनंतर शिक्षणानिमित्त काही कामानिमित्त एकमेकांपासून दुरावले जातात. त्यावेळी मोबाईल हा क्वचितच पाहायला मिळायचा. त्यामुळे एकमेकांचा संपर्कही ठेवणेही फारच मुश्किल होते. मात्र या डिजिटल युगात सोशल मिडियामुळे दुरावलेले दहावीचे वर्गमित्र तब्बल २० वर्षांनंतर व्हाॅटसअप च्या माध्यमातून जोडले गेले. त्यानंतर एकमेकांची चॅटिंग सुरू झाली, असे करत असताना प्रत्यक्ष भेटीची ऊत्कंठा सर्वांची जागृत झाली. त्यासाठी टाकळी येथील वर्गमित्र उपसरपंच कडुबाळ सुसे यांनी पुढाकार घेऊन थर्टी फर्स्टच्या दिवशी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. यामध्ये जवळपास सर्वच मित्र सहभागी झाले होते. विविध ठिकाणांहून सर्व मित्र एकत्र आले होते. शुक्रवारी टाकळी येथील शेतात सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे स्वागत करत स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
दरम्यान सुसे यांनी सर्व वर्गमित्रासाठी व्हेज, नॉनव्हेज जेवणाचे आयोजन देखील केले होते. याप्रसंगी सर्व मित्रांनी शेतातील रानमेव्याबरोबर जेवणाचा आस्वाद घेत, आठवणींना उजाळा दिला. यातील कुणी शिक्षक, कुणी व्यवसायिक, कुणी प्रगत शेतकरी, तर कुणी राजकारणात सक्रिय झाले असल्याचा परीचय दिला. २० वर्षानंतर हा मिलाप सर्वांना नवऊर्जा देऊन गेला. या निमित्ताने आपण ठरविल्यास पुन्हा एकदा गुरुजणांसोबत असा स्नेहमेळावा करु, अशी सदिच्छा सर्व मित्रांनी व्यक्त केली. याप्रसंगी सर्वांच्याच चेहऱ्यांवर एक समाधान व मित्रभेटीचा आनंद होता. या कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन उपसरपंच कडुबाळ सुसे यांनी केले.
याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश सोलाटे, शिक्षक विलास चांदणे, प्रो.गणेश इंगळे, चेअरमन सुरेश शेळके, पत्रकार विलास लाटे, युवा उद्योजक बद्रीनाथ जाधव, राहुल इंदोरे, केवल भुस, समीर शेख, दत्ता बर्डे, बंडु पठाडे, नाना मुळे, गणेश केदार, शंकर थोरात, हरी गिरी, दिवटे, मच्छिंद्र खुणे, संतोष मुळे, मजित शेख, मच्छिंद्र लाटे, कडुबाळ जाधव, अशोक जामदार, प्रभाकर जाधव, रामेश्वर बोबडे, कैलास भावले, प्रशांत खुटेकर, बाबासाहेब बोबडे, मेहराज सय्यद, सोमिनाथ जाधव, संजय नरवडे, संजय नाडे, जिजा नाचण सह आदीं उपस्थित होते.
0 टिप्पण्या