राहुरी खुर्द येथे घर तेथे लस या मोहिमे अंतर्गत प्रबोधन व लसीकरण


राहुरी शहर/अशोक मंडलिक : दि. 8 जानेवारी 2022 रोजी राहुरी खुर्द येथे घर तेथे लस या मोहिमे अंतर्गत नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी प्रबोधन करुन लसीकरण करण्यात आले.

लसीकरणासाठी राहुरीचे तहसीलदार शेख व बी.डि.ओ. खामकर, राहुरी खुर्द येथील आरोग्य उकेंद्राच्या आरोग्य सेविका सौ. पूजा झिरपे तसेच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राहुरी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, ग्रामपंचायत चे सदस्य सौ. अश्विनी सुनिल कुमावत, असफभाई पठाण, युवराज तोडमल, स्वप्नील कांबळे, सचिन शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक जगधने व राहुरी खुर्द येथील सर्व आशा सेविका निलिमा क्षिरसागर, अनिता शेडगे, शाईन शेख आदि उपस्थित होते.

या सर्वांच्या उपस्थितीत घर तेथे लस झाल्यानंतर राहुरीचे तहसीलदार शेख व पंचायत समितीचे बि. डी. ओ. खामकर यांनी राहिलेल्या नागरीकांना लस घेण्याचे आवाहन केले आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या