सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ शेंडी विद्यालयात मास्क वाटप

युवा फाउंडेशन लहीत यांच्यावतीने स्तुत्य उपक्रम

अहमदनगर/ जावेद शेख : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) अकोले येथे निराधारांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ युवा फाउंडेशन लहीत अकोले यांच्या वतीने शेंडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी.एन., युवा फाउंडेशन लहीत चे सामाजिक कार्यकर्ते व विद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वप्नील बाळासाहेब गोडसे, दत्तात्रय गोडसे, प्रदीप जाधव, ऋषिकेश पवार यांनी मास्क वाटप केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी.एन. यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माजी विद्यार्थ्यांचा नेहमीच विद्यालयाला सहकार्य असते रोंगटे डी. एन. यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी रवींद्र गायकवाड, यादव कोटकर, नरेश खाडगीर, दीपक बाळसराफ, आनंद चौधरी, विकास आवारी, गोपाल दराडे, बापू महाले, प्रभाकर गावंडे, एकनाथ मुकणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश पाडेकर तर आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या