राहुरी शहर/अशोक मंडलिक : मुळा धरणातील उपलब्ध असलेल्या साठयातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याकरीता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ केली आहे.
यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा व भंडारदरा ही दोन्हीही धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली आहेत. तसेच धरणांच्या लाभक्षेत्रातही जोरदार पर्जनवृष्टी झाल्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने आजपर्यंत शेतीसाठीच्या आवर्तनाची आवश्यकता लागली नाही. परंतु आता ऊसाबरोबरच गहू, हरबरा, ज्वारी व चारा पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. तसेच आता विहीरींच्या पाण्याच्या पातळीमध्येही घट होऊ लागली आहे. यासाठी तातडीने आर्वतन सोडणे आवश्यक आहे.
धरणांच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या कालवा सल्लागार समित्यांच्या अध्यक्षपदी संबंधीत जिल्हयांचे पालकमंत्री पदसिध्द अध्यक्ष आहेत. कालवा सल्लागार समित्यांच्या बैठकी शिवाय धरणातून आवर्तन सोडता येत नाही. याकरीता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने आयोजित करावी अशी मागणी श्री. तनपुरे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या