विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास अनाप हे होते. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बालविद्या मंदिर व कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थी आयुष महिंद्रकर, स्वामिनी धोंगडे, अंजली नजन, वृषाली बोऱ्हाडे, सोफिया शेख, स्वरांश दायमा, वृंदा मुंडलीक, श्रद्धा परजणे, निकिता पंडित, आर्या मेहेत्रे, ज्ञानेश्वरी नजन, देवकीनंदन जोशी आदि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षिका स्वाती शेजुळ मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी मुख्याध्यापक अनाप कैलास यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक रवींद्र घनवट यांनी, सूत्रसंचालन प्रा. भडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. चव्हाण मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका मंजिरी देशपांडे, पर्यवेक्षक पारस जैन, प्राध्यापिका महाडुळे मॅडम, बाल विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गुलाब मोरे, कविता शिंदे मॅडम तसेच बाल विद्यामंदिर शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या