राहुरी शहर/ अशोक मंडलिक : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त व महिला शिक्षक दिन याचे औचित्य साधून वांबोरी येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक शाळेतील शिक्षिकांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मीना पवार व श्री संत सावता माळी युवक संघा तर्फे सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनील शिंदे, जयश्री साखरे, सुवर्णा शिंदे, दिपाली शिंदे यांनी प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी चौथीतील मुलगी खुशी सोनवणे हिने सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा सादर केली. व चौथीतील धांबोरे समृद्धी, तिसरीतील कुऱ्हे प्राप्ती, दुसरीतील पारखे ज्ञानेश्वरी विद्यार्थिनींची भाषणे झाली. यावेळी सुत्रसंचालन वैशाली सोनार यांनी केले व आभार तोडमल आशा यांनी मानले. यावेळी शिंदे उर्मिला, तोगे स्मिता, शिंदे शिल्पा, पटारे दिपाली, तोगे योगिता आदी महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
महिला ह्या विद्याज्ञानाचे मोलाचे कार्य करीत आहेत. समाज परिवर्तन करत असताना समाज्याचा अविभाज्य घटक आहे. त्यांचाही सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान संघामार्फत करीत आहोत. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा छायाताई फिरोदिया यांचे विशेष सहकार्य लाभले असे प्रतिपादन अशोक तुपे यांनी केले.
0 टिप्पण्या