शेंडी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बँकिंग क्षेत्रात करिअर करा - सचिन कडलक

अहमदनगर/ जावेद शेख : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बँकिंग क्षेत्रात करिअर करा जिद्द, चिकाटी, कष्ट असेल तर यश नक्कीच मिळेल, फक्त वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बँकिंग क्षेत्राकडे बघतात असे नाही इतर शाखेतील विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्याच्या काळात उत्तर भारतातील लोकांचा समावेश बँकींग क्षेत्रात जास्त आहे. मराठी मुलांनी देखील चांगला अभ्यास करून बँकिंग क्षेत्रात चांगल्या प्रकारची नोकरी मिळवता येईल असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र अकोले शाखेचे व्यवस्थापक कडलग यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी.एन. होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजुर यांचे देखील व्यवस्थापक सोनवणे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर विद्यार्थी प्रतिनिधी करण गुडणर, पवार रेशमा, भोइर शितल, खाडे लक्ष्मी, सुरेखा कातडे, पवन खाडे यांनी अतिशय निर्भीडपणे मनोगत व्यक्त केले. तसेच बांडे रूपाली हिने सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता सादर केली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांमध्ये वाढ होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी. एन. विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा, बँकिंग क्षेत्राविषयी सखोल माहिती मिळावी याविषयी व्यवस्थापक कडलक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिवाजी बुरके, दत्तात्रय महाले, राजेंद्र चव्हाण, प्रभाकर गावंडे, दीपक बाळसराफ, गोपाल दराडे, अनुसया वाळेकर, औसरकर, गणेश वैद्य, किरण आवारी, मेंगाळ, भोईर आदी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना नरेश खाडगीर, अनुमोदन विकास आवारी यांनी दिले तर सूत्रसंचालन महेश पाडेकर तर आभार आनंद चौधरी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या