अहमदनगर / जावेद शेख : नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वेण्णा लेक जवळील वन विभागाच्या छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले. त्याचे काल दि. २८ जानेवारी २०२२ रोजी आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हिलदारी अभियानांतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी यांच्या मार्फत महाबळेश्वर व आसपासच्या गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्हिजिबल चेंज अंतर्गत वन विभागाच्या छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानात जुने टायर व इतर वस्तूंपासून काही नवीन खेळणी बसविण्यात आली असून जुन्या खेळण्यांची दुरुस्ती करून आकर्षक अशी रंगरंगोटी सुद्धा करण्यात आली आहे.
यासोबतच सदर उद्यानात ५० किग्र रिसायकल प्लास्टिक वेस्ट पासून तयार करण्यात आलेली लीटरबिन व ७० किग्र प्लास्टिक पासून तयार झालेले बेंच सुद्धा बसविण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना वेण्णा लेक सोबतच एक निवांत ठिकाण तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी उपलब्ध झाल्याने पर्यटकांना जास्तीत जास्त वेळ येथे घालवणे सोयीचे होईल.
यावेळी महाबळेश्वर च्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, पंचायत समिती महाबळेश्वर चे गट विकास अधिकारी अरुण मरभळ, विस्तार अधिकारी सुनील पार्टे, सभापती संजय गायकवाड, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुळकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे, वाई च्या वनक्षेत्रपाल स्नेहल मगन, हिलदारी चे प्रोजेक्ट लीड डॉ मुकेश कुळकर्णी, प्रवीण भिलारे, रोहित ढेबे, संदीप मोरे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे संजय दस्तुरे, विलास काळे, सचिन शिर्के, अजित कुंभारदरे, वन विभागाचे कर्मचारी व हिलदारी टीम चे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या