मानपत्र तयार करणे ही एक आत्मीय कला आहे- डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : मानवी संस्कृती ही व्यक्तींच्या योगदानातून आकाराला आलेली असते. कुटुंब, समाज, राष्ट्रभक्ती, साहित्य अशा अनेक क्षेत्रात माणूस समर्पित होतो त्यांच्या सन्माप्रीत्यर्थ मानपत्र तयार करणे ही जिव्हाळा, ऋणानुबंध आणि प्रेरणादायी जाणिवेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज असलेली तितकीच एक कला असते असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माळेवाडी येथील स्वातंत्र्यसेनानी श्री एकनाथराव लक्ष्मणराव पाटील औताडे यांच्या 98 व्या वाढदिवसाच्या व सन्मान सोहळ्या प्रसंगी मानपत्र लिहिल्याबद्दल डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

वाचन संस्कृतीला बळ आणि प्रतिष्ठा देणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार करताना मोरगे पाटील बहुद्देशीय फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र मोरगे श्रीरामपूर, सचिव ऋषीकेश मोरगे श्रीरामपूर, श्री एकनाथराव लक्ष्मणराव पाटील औताडे सन्मान सोहळा संयोजक भाऊसाहेब औताडे, माळेवाडी, इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संजय फापाळे उपस्थित होते. डॉ. उपाध्ये यांनी या सर्व मान्यवरांना 'समाजचिंतन ' पुस्तके देऊन आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या