श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा संपर्कप्रमुख संजय जी खंडागळे यांच्या हस्ते व शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, श्रीराम मस्के, रोहन मोरे, निलेश गोरे, नितीन शिंदे यांसह अनेक शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यकरणी मध्ये शिवसेना श्रीगोंदा तालुका संघटक पदी सुरेश देशमुख यांना नियुक्त करण्यात आले. शिवसेना उपतालुका प्रमुख पदी निलेश साळुंखे, शिवसेना उपतालुका प्रमुख पदी रघुनाथ सूर्यवंशी, शिवसेना उपतालुका प्रमुख पदी शरद नागवडे, अल्पसंख्याक शहर प्रमुख पदी जमीलभाई शेख, भटक्या विमुक्त जाती जमाती शिवसेना तालुका प्रमुखपदी सुदाम सावंत, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख पदी शिवाजी राऊत, शिवसेना शहर संघटक पदी नितीन गायकवाड, शिवसेना ओबीसी शहर प्रमुख पदी अनिल सुपेकर, शिवसेना उपशहरप्रमुख पदी संजय नेवसे, शिवसेना उपशहरप्रमुख पदी ढवळे आदींच्या निवडी करण्यात आल्या.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या पदाधिकारी नियुक्त्या करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. या पदाधिकाऱ्यांचे काम पाहून त्यांना कायम करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या