दिवसभरात शेतातून विहिरीपर्यंत त्याला विनाकारण असंख्य हेलपाटे मारावे लागत लागल्याने तो महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पूर्णतः हतबल झाला आहे. सध्या शेतीसाठी विद्युत पंपांना दिवसा फक्त आठच तास वीज दिली जाते. त्यातही जवळपास तीन ते चार तास वीज खंडित केली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अगोदरच कोरोना संकट, सततची वाढती महागाई, दुधदराचीही झालेली घसरगुंडी, अवेळी पडणारा पाऊस व त्यामुळे सततचे धुके व खराब हवामान यामुळे पिकांवर करावी लागणारी महागड्या औषधाची फवारणी व त्यात आणखी भर म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व विनापूर्वसुचना रोहित्र बंद यामुळे बळीराजा पूर्णतः पिचला आहे. एकूणच महावितरणचा गलथान व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये व लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करून बळीराजाला दिलासा द्यावा.
_बाळासाहेब भोर ; शेतकरी, पेमगिरी
0 टिप्पण्या