गारपीट वादळी पावसाचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा- हर्षल पा फदाट

तहसीलदार जाफ्राबाद मार्फत कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर

अहमदनगर/ जावेद शेख : मराठवाडा, विदर्भ मध्ये दि. २८ डिसेंबर २०१२ रोजी दुपारच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक झालेल्या गारपीट व वादळी पाऊसाने विदर्भ व मराठवाडातील रब्बी हंगामातील गहु, हरभरा, मका, ज्वारी, कांदा, तुर व यावर्षी शेतकरी बांधवांनी पेरलेली उन्हाळी सोयबीन या पिकांचे गारपिटीने व वादळी पावसाने अतोनात नुकसान झाले. झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मा. तहसीलदार जाफ्राबाद यांच्या मार्फत कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी सुनील फदाट ओम खंदाडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या