वंचितकडुन नूतन वर्षा निमित्ताने खिस्ती बांधवांना मिठाई व फळे वाटप

राहुरी शहर / अशोक मंडलिक : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षा निमित्ताने राहुरी येथील स्नेह सदन चर्च येथे मिठाई व फळे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन वर्षा निमित्ताने प्रमुख धर्मगुरू अनिल चक्रनारायण यांनी प्रवचन देताना सांगितले की, आपले आई वाडिल खरे आपले आयडोल आहेत. तेच आपले हिरो आहेत. त्यांच्या सेवेतच परमेश्वर सेवेचा लाभ होतो. प्रवित्र मिसा झाल्यानंतर उपस्थित भाविकाना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे, प्रविण मनतोडे, अरुण मकासरे, विनोद पंडीत, पंकज नारद, दिपक ढगे, विराज साळवे, रवि साळवे, अनिल शिंदे, गायकवाड, प्रकाश भोसले आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या