राहुरी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. शेटे तर उपाध्यक्षपदी ॲड. ढोकणे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी वकील संघटनेच्या वार्षिक 2022 च्या पदाधिकारी निवडीच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी ॲड. राहुलभैय्या शेटे, उपाध्यक्ष पदी ॲड.कारभारी ढोकणे हे निवडून आले आहे. तसेच सचिव पदी ज्ञानेश्वर कोळसे, सहसचिव पदी चंद्रशेखर शेळके यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी निवड निर्णय अधिकारी म्हणून पांडुरंग सोनवणे यांनी काम पाहिले. निवडून आल्यानंतर आपली राहुरी वकील संघटना एक मजबूत, भक्कम संघटना असून‌ सिनिअर डिव्हीजण, नवीन वास्तूसह लाब्ररी तसेच पडलेल्या शेड मध्ये नवीन बांधकाम या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुलभैय्या शेटे यांनी सांगितले.

या पदाधिकारी निवडींचे ॲड. विक्रम आघाव, ॲड. भास्करराव शिरसाठ, ॲड. नानासाहेब तनपुरे, ॲड. जालिंदर ताकटे, ॲड. अशोक तनपुरे, ॲड. कचेश्वेर घाडगे, ॲड. सुभाष भंडारी, ॲड. अनिल वाळके, ॲड. जीवन राऊत, ॲड. प्रशांत मुसमाडे, ॲड. सुनील घोगरे, ॲड. गणेश तोडमल, ॲड. विठ्ठल कोबरणे, ॲड. प्रसाद कोळसे, ॲड. गजू तनपुरे, ॲड. सुहास तोडमल, ॲड. संदीप खपके, ॲड. वैभव आघाव, ॲड. माऊली येवले, ॲड. विजय तनपुरे, ॲड. राका, ॲड. अमोल धोंडे, ॲड. संभाजी कदम, ॲड. संजय कदम, ॲड. योगेश शिंदे, ॲड. संदीप खपके, ॲड. अमोल डौले, ॲड. किरण धोंडे, ॲड. अनिल डोके, ॲड. सचिन कोळसे, ॲड. विनोद शेटे, ॲड. मोहनिष शेळके, ॲड. ऋषी पंडित, ॲड दिघे, ॲड. विलास उदावंत, ॲड शिंगी, ॲड. देवेंद्र कुलकर्णी, ॲड प्रसाद सांगळे, ॲड मनीष काकानी, ॲड बाळासाहेब लहाने, संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या