संत तेरेजा शैक्षणिक संकुल हरिगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : संत तेरेजा शैक्षणिक संकुल येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवनाथ गायके, भारतीय लष्कर सेनेतील शाळेचे माजी विद्यार्थी मेजर सचिन बागुल, सहाय्यक धर्मगुरू रे.फा. रिचर्ड , रे.फा. सचिन मन्तोडे, माजी मुख्याध्यापक पारधे, वर्ल्ड पार्लमेन्ट सदस्य भिमराज बागुल, सुपर वायझर बलमे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक चित्ते सर तसेच प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव व संत तेरेजा बॉईज हायस्कुल चे प्राचार्य रे.फा. डॉमिनीक रिझारिओ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

सुरवातीला बलमे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत परिचय करून दिला. ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी समर गित सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती पारखे यांनी केले. प्रत्येक वर्षाची परंपरा राखत इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याच्या पालका कडुन ध्वजारोहण करण्यात येते. यावेळी इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी शुभम गायके यांचे वडिल नवनाथ गायके यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी रे.फा.रिचर्ड ,रे.फा. सचिन मन्तोडे, पारधे चित्ते शिक्षक प्रतिनीधी राठोड सचिन बागुल, विद्यार्थी प्रतिनीधी हर्षल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात रे.फा. डॉमिनिक रोझरीओ यांनी भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचा उल्लेख करत महत्त्व पटवुन देत उपस्थीत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीते साठी सोनावणे, गायकवाड, अनिल जाधव, मंदा, पुष्पा, बलमे व सर्व शिक्षक वृन्द यांनी परिश्रम घेतले शेवटी हिवाळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या