वाचकपीठ ची १८ वी दृकश्राव्य चर्चा संपन्न

राहुरी / बाळकृष्ण भोसले - वाडमयीन टोळ्यांच्या नादी न लागता समकालीन वाड्मयाची अभ्यासपूर्ण चिकित्सा व्हायला हवी, कलावंतांच्या कलावंतपणाला बाहेर येऊ द्यायला हवे, निमिर्ती हा सर्वसामान्य व्यवहार आहे, त्यादृष्टीने वर्षा ढोके यांचा काव्यसंग्रह महत्वपूर्ण दस्त ऐवज असुन त्यामध्ये भवतालचा संघर्ष आहे असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

वाचकपीठ च्या अठराव्या दृकचित्र साहित्य चर्चा मध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. वर्षा ढोके- सय्यद यांच्या अनागोंदी च्या नोंदी या काव्यसंग्रहावर झालेल्या चर्चेत योगिनी राऊळ, मुंबई, प्रा.मनोज मुनेश्वर, रामटेक, वाचकपीठ चे सदस्य प्रा.डॉ. शंकर चव्हाण, ज्योती धर्माधिकारी व शब्दगंध च्या राज्य संघटक, कवयित्री शर्मिला गोसावी सहभागी झाले होते.

पुढे बोलताना डॉ.जोशी म्हणाले कि,वर्तमाननीट वाचला पाहिजे, तरच भविष्यकाळ सुकर होऊ शकतो, वर्चस्ववाद हा माणसांच्या अस्तित्वा पर्यंत राहणार असुन तो संपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. योगिनी राऊळ म्हणाल्या कि, लॉकडाऊनच्या काळात एकटेपणा दूर होण्यासाठी हा उपक्रम अतिशय योग्य असुन महाराष्ट्रातील कवींनी एका कवीला समजुन घेणं महत्वाचे आहे.
कवयित्री वर्षा ढोके सय्यद प्रसंगी म्हणाल्या 'लिहिणे हा आमचा छंद असुन दिसणारा भोवताल शब्दबंध करण्याचा मी प्रयत्न करते'. यावेळी त्यांनी 'स्वप्नं विकणारे राज्यकर्ते' व 'ब्रेकिंग न्युज' या कवितांचे वाचन केले. यावेळी प्रिया धारूरकर यांनी प्रस्ताविक केले,भास्कर निर्मळ यांनी स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा ननवरे यांनी केले तर शेवटी भास्कर दादा लगड यांनी आभार मानले.

या चर्चेत प्राचार्य चंद्रकांत भोसले, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अरविंद सोनवणे, भानुदास महानोर, भास्कर लगड, ज्योती कुलकर्णी, ललिता गोपाळ, डॉ. महेश खरात, मारुती सावंत, रामदास खरे, संजय थोरात, सुनील गुडघे, योगिता राजकर, रागिणी चौधरी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कवी, साहित्यिक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या