इपीस 95 वेलफेयरचे जिल्ह्यात पेन्शनर बचाव अभियान

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : ईपीएस ९५ पेन्शनर वेल्फेअर असोसिएशन राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे मार्गदर्शनानुसार पेन्शनर बचाव अभियान देशभर राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात त्यानुसार सोमवार दि. २४ जानेवारी २०२२ रोजी स.१२:०० वा. श्रीरामपूर ( काॅंग्रेस भवन )दु. ३:१५ वा. नेवासा मंगळवार दि.२५ जानेवारी २०२२ रोजी स.१०:०० वा. पाथर्डी दु.१:०० वा. अहमदनगर पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र देणे, खासदार यांना भेटून निवेदन देणे व त्यांच्या कडून पंतप्रधान यांना पत्र घेणे. जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना पंतप्रधान यांचे नावे निवेदन देणे, संबंधित आमदारांना भेटून निवेदन देणे. वरील सर्व बाबींची पूर्तता करून अभियान राबवावयाचे आहे.

जिल्ह्यातील उत्तर भागातील NAC कार्यकर्ते श्रीरामपूर येथे व दक्षिण भागातील अहमदनगर येथे उपस्थित राहावे. संघटनेचे पदाधिकारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त पेन्शन धारकांनी कोविड नियमांचे पालन करुन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या