नगर मनमाड महामार्गावर सफरचंदाचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी खुर्द मध्ये नगर-मनमाड राज्य महामार्गावर सफरचंदाचा ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी उशीरापर्यंत हि वाहतूक सुरळीत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. 

शुक्रवारी सकाळी राहुरीकडून नगरच्या दिशेने चाललेला सफरचंदाचा ट्रक राहुरी खुर्द येथील मुळा नदिच्या पुलाजवळ रस्ता दूभाजकावर आदळुन हा ट्रक पलटी झाला. त्यामधे ट्रकचे व सफरचंदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सफरचंदाचा सडा पडला होता.

अनेक नागरीकांनी ह्रा सफरचंदावर डल्ला मारला. रस्यावरच हा अपघात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहनांच्या रांगा लागल्याने पाच-सहा किलोमिटर पर्यंत हि वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन काम करत होते माञ उशीरापर्यंत हि वाहतूक सुरळीत करण्यात पोलीसांना यश आले नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या