डॉ. तनपुरे कारखान्याच्या दोन संचालकांची खडाजंगी

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे पुर्व भागातील एक संचालक उत्तम प्रकारे सभासदांचे प्रश्न चेअरमनच्या कार्यालयात मांडीत असताना चेअरमन व संचालक त्या प्रश्नावर सखोल चर्चा करत असताना नगर पालिका हद्दीतील एका संचालकाने सखोल चर्चेत नाक खुपसुन चर्चेचा भंग केल्याने पुर्व भागातील तो संचालक आक्रमक होत नगर पालिका हद्दीतील त्या संचालकावर शब्दांचे आसुड ओढू लागला. त्यातच दोघांत खंडाजंगी सुरु झाली. त्याचवेळी पुर्व भागातील संचालकाने तांब्याच्या भांड्या सारखा नको तेथे आवाज काढतो कशाला? पुर्व भागातील संचालकाचा आक्रमकता पाहुन चेअरमनसह संचालकही आवक झाले.

कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील चेअरमनच्या कार्यालयात चेअरमनसह काही संचालक बसले होते. पुर्व भागातील एक संचालक चेअरमन यांची परवानगी घेऊन सभासदांचे प्रश्न उत्तम प्रकारे मांडून त्यावर सखोल चर्चा करीत असताना उपस्थित असलेला नगर पालिका क्षेञातील संचालकाने सखोल चर्चेत नाक खुपसुन चर्चेचा भंग केला. हा नित्याचा प्रकार असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतू उत्तम प्रकारे सभासदांचे प्रश्न मांडणाऱ्या संचालकाचा पारा चढला. माझ्या चर्चेत तुझे नाक खुपसण्याचे कारण काय? असा प्रश्न करत दोन्ही संचालकात खडाजंगी सुरु झाली. उपस्थित संचालकांनी हस्तक्षेप करुन दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आमच्या चर्चेत तांब्याच्या भांड्या सारखा आवाज करत चर्चेत विघ्न आणण्याचे याचे कारण काय ? असा प्रश्न करत तु किती मताने निवडून आला आहे. हे सर्वांना माहित आहे. प्रत्येक ठिकाणी नाक खुपसण्याचा प्रयत्न करु नको अशा भाषेत सुनवित असताना नगर पालिका क्षेत्रातील तो संचालक मान खाली घालून ऐकून घेत होता. एरवी पुर्व भागातील प्रश्न उत्तम प्रकारे शांतचित्तेने मांडणारा संचालकाचा रुद्र अवतार पाहुन चेअरमनसह उपस्थित संचालक आवक झाले.

पुर्व भागातील त्या संचालकास इतर संचालकांनी शांत करुन तुमची भुमिका योग्य आहे. तुम्ही उत्तम प्रकारे सभासदांचे प्रश्न मांडत होता. नगर पालिका हद्दीतील संचालक नेहमीच कोणीही आपली भुमिका चेअरमन व कारखान्याचे तज्ञ संचालक खा.सुजय विखे यांच्या समोर मांडत असले की हा संचालक मध्येच नाक खुपशित असतो. संचालक मंडळाच्या बैठकीतही हाच हुषार संचालक असल्या सारखा बोलत राहतो. दुसऱ्या संचालकांना बोलू देत नाही. एखादा संचालक बोलला तरी त्या विषयात नाक खुपसण्याची याची सवय आहे. आज तुम्ही चांगलाच फैलावर घेतला बरे झाले त्याची खोड मोडेल तरी आता.असे म्हणून इतर संचालकांनी पुर्व भागातील संचालकाचे कौतुक केले.

पुर्व भागातील संचालकाने चांगलेच फैलावर धरल्याने नगर पालिका क्षेत्रातील त्या संचालकाने चेअरमनच्या कार्यालयात उभे राहुन पांढरे कपडे झटकून बाहेर पडला. हा संचालक राहुरी फँक्टरीवर दिसतो पण कारखान्याच्या चेअरमन कार्यालयाकडे फिरकला सुद्धा नाही. दरम्यान कामगारांच्या प्रश्नातही याच संचालकाने नाक खुपसल्याने सुटण्यास आलेला प्रश्न या संचालकामुळे लटकून राहिला आहे. या कामगारांचाही अनेक दिवसा पासुन दात होता. माञ पुर्व भागातील संचालकाने रुद्र रुप धारण करुन नगर पालिका क्षेत्रातील त्या संचालकाची उतरविल्या मुळे कामगार वर्गात याबाबत खमंग चर्चा रंगली होती. या पुढे हा संचालक कोणाच्याही प्रश्नात नाक खुपसताना दहा वेळा विचार केल्या शिवाय राहणार नाही. सभासदांचे उत्तम प्रकारे प्रश्न मांडणाऱ्या संचालकाचे संचालक मंडळ व कामगार वर्गातून कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या