प्रेरणा समुहाचे तळागाळातील समाजाला आर्थिक बळ देण्यासाठी मोठे काम - मा. खा. तनपुरे

राहुरी / बाळकृष्ण भोसले - दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा मल्टीस्टेट घराघरात पोहोचत आहे. या दोन्ही संस्थांच्या मार्फत समाजातील तळागाळातील अडीअडचणीत असणाऱ्या समाजाला आर्थिक बळ देण्यासाठी मोठे व दिपस्तंभासारखे काम कायमचे उभे केले आहे. हे काम राज्यातील सहकाराला दिशा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. दोन्ही संस्था पुढच्या वर्षी शंभर शंभर कोटी ठेवीच्या टप्प्यापुढे असतील असा आशावाद मा .खा प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केला.

प्रेरणा पतसंस्था व मल्टीस्टेट च्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खा. प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कॉ. कार्यकर्ते गंगाधर जाधव होते. प्रेरणाचे समुहाचे संस्थापक सुरेश वाबळे प्रसंगी म्हणाले की, स्व. डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी अहमदनगर जिल्हा व राज्यात सहकार चळवळ वाढविली.

सर्वसामान्यांचे विकासाचे प्रगतीचे स्वप्न त्यांनी सहकारातून पाहिले त्यांच्याच आशीर्वादातून पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवी गोळा करणे व कर्ज वितरण करणे एवढाच उद्देश न ठेवता प्रेरणा परिवाराने कायमच सामाजिक दायित्वाची भूमिका ठेवली. कोरोना काळात अनेक आजारी रुग्णांना अर्थसाहाय्य केले तर घरातील कर्ता पुरुष कोरोना ने गेलेल्या कुटुंबांना उभे करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केल्याच समाधान आहे. मा. खा. प्रसादराव तनपुरे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन समृद्ध समाज निर्मितीसाठी सहकारातून प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, गजानन सातभाई, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, प्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, प्रेरणा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, प्रा वेणुनाथ लांबे, मच्छिंद्र हुरुळे, सुजित वाबळे, प्रशांत वाबळे, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वर्पे, संजय माळवदे, रवींद्र हिवाळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या