सुगी फौंडेशनच्या वतीने स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर राहुरीत संपन्न


अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील असंघटित कामगार, मोलमजुरी करणारे कामगार महीला, धुणीभांडी काम करत असलेले घरकामगार महीला यांना सुगी फौडेशंनच्या वतीने स्वतःचा व्यवसाय करता यावा म्हणून कुटीरोद्योग बाबत स्वयंरोजगार निर्माण करून एकविसाव्या शतकातील जागतिकीकरणामध्ये स्वतःचे कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी आपण आपल्या समूहामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करून मूलभूत गरजांसाठी उपजीविकेचे साधन स्वतःच उभा करण्यासाठी सुगी फाउंडेशन अंतर्गत वर्तमानकाळात व भविष्यकाळात छोट्या-मोठ्या व्यावसायातून जिल्ह्यातील व तालुक्यातील ग्रामीण भाग व शहरी भाग वंचित घटकातील कुटुंब व समूहांना स्वावलंबी करण्यासाठी आपण आपले स्वतःचे रोजगार कौशल्य नेतृत्व कृतिशील समूहात निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

या आधी आपण २०२० या वर्षात कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा गरजू महिलांना आपल्या सुगी फौंडेशन अंतर्गत घरच्या घरी गरजु महीलानीं मास्क बनविले व मार्केटमध्ये आपण मास्क बनवून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन सुगी फौंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप कोकाटे यांनी गरजू महिलांना सविस्तर कृतिशील स्वयंरोजगार बाबत मार्गदर्शन केले.

यापुढे आपण अंतर्गत गरजू बहुजन समाजातील कुटुंबांसाठी स्वावलंबी होण्यासाठी सुगी फौंडेशन अंतर्गत आपण भविष्यात प्रयत्न करत राहणार आहे. असे आश्वासन रोजगार मार्गदर्शन शिबिरामध्ये परखड मत संस्थापक अध्यक्ष संदीप कोकाटे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रविण गाणार, बेबीताई शिंदे, आयशा शेख, राणी जगंम, अजुंम शेख, रेश्मा लोखंडे आदि प्रमुख महीला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या