मुख्याध्यापक मधुकर बिरहारे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा स्वरचित कविता सादर केल्या. भूमिका सरोदे, रूद्र दुरत, हर्षल पाटील, व्यंकटेश शिंदे, सुजल पाटील या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी अभ्यासपूर्ण भाषणे केली. चंचल सैंधवकर हिने अतिशय सुंदर रांगोळी काढली होती.
प्रमुख वक्त्या मंगला गायधने यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर चाटुपळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचा जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षिका सुजाता तोष्णीवाल, जयश्री महाजन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका सरोदे तर आभार हर्षल पाटील याने मानले.
0 टिप्पण्या