श्रीगोंदा/सुभाष दरेकर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष संजय आनंदकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या दक्षिण अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आनंदकर यांना प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
निवडीनंतर बोलताना आनंदकर म्हणाले की, सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा वापर करीन व पवार साहेबांचे विचार घराघरात पोचवण्याचं काम करीन. या पदाच्या माध्यमातून ओबीसीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन.
यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभाग समन्वयक सुहास उभे, पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, श्रीगोंदा तालुका अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अजीमभाई जकाते, संदीप दहातोंडे, भोजराज मोटे आदी उपस्थित होते. या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या