राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी कन्या कु तेजस्वीनी विकास गायके यांनी खडांबे कृषी जागरूकता आणी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अभ्यास दौ-या दरम्यान शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना शेती विषयक मार्गदर्शन केले.
या मध्ये तुरीवरील एकात्मीक किड नियंत्रण, पशुसवर्धन, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मेंढी, शेळीपालन, शेतीचे यांत्रिकीकरण ह्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. कृषी कन्या तेजस्वीनी गायके यांचे कृषिविषयक मोलाचे मार्गदर्शन झाल्याने गावच्या शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले. यावेळी खडांबे गावचे प्रगतशिल शेतकरी कृषी भुषण सुरसिंगराव पवार, रामदास कदम, भाऊसाहेब माने, विकास गायके, यांसह खडांबे गावचे शेतकरी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या