राहुरी फॅक्टरी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याकरिता राहुरी फॅक्टरी येथील मनसे आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनसे तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहे.
या निवेदनावर परिसरातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी वैभव गाढे, सचिन सोनवणे, सौरभ निकम, रोहित सोनवणे, सिद्धार्थ उगले, अमित सांगळे, ओंकार तारडे आदी मनसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या