मानोरी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ठुबे, उपाध्यक्षपदी ढेरे

आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती (ठुबे वस्ती) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब काशिनाथ ठुबे व उपाध्यक्षपदी राजेंद्र बापुसाहेब ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.

     निवड प्रक्रिया शाळेच्या सभागृहात करण्यात आली. या प्रसंगी दिलावर पठाण, मनोज ठुबे, लक्ष्मण लोंढे, विजय ठुबे, नानासाहेब आढाव, लक्ष्मण गुंजाळ, काळु पवार, बापुसाहेब ठुबे, सोमानाथ ठुबे या पालकांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मोरे यांनी केले तर आभार सुगतकुमार वाघमारे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या