हिंदू रक्षक वारकरी संत परिषद यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा

हिंदू रक्षक वारकरी संत परिषद यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा ह.भ.प.मंहत उद्धवजी महाराज मंडलिक,कृष्ण कृपांकित वैराग्यमुर्ती ह.भ.प.डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ यांच्या शुभहस्ते व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव महाराष्ट्र राज्य हिंदू रक्षक वारकरी संत परिषद यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा ह.भ.प.मंहत उद्धवजी महाराज मंडलिक,कृष्ण कृपांकित वैराग्यमुर्ती ह.भ.प.डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ यांच्या शुभहस्ते व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वामी रामानंद गिरी,मुक्तानंद स्वामी, तहसीलदार फिसोद्दिन शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, जि प सदस्य धनराज गाढे,माजी उपसभापती रविंद्र आढाव,संचालक डॉ तनपुरे कारखाना शामराव निमसे, अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह गणेश भांड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि २९ जुलै रोजी दुपारी २ वा. राहणे पाटील मंगल कार्यालय आरडगाव येथे संपन्न होणार आहे .
      संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशोरजी महाराज जाधव उपाध्यक्ष संजय महाराज शेटे,कार्याध्यक्ष माऊली क्षिरसागर,खजिनदार साहेबराव मोरे,बजरंग युवासेना राष्ट्रीयअध्यक्ष राजेंद्र डमरे,उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अवचितानंद महाराज अहिरे,बजरंग युवा सेना उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र वाघ,सरचिटणीस सुरेश उंडे,सोशल मिडिया दिपक बुरुंडे, सचिव भगवान नाईकवाडे, सहसचिव हेमंत पाटील प्रभाकर कुमकर,बाबा महाराज मोरे, या विषवस्त व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य किशोरजी महाराज जाधव यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या