
बंधारे दुरुस्तीसाठी दुजाभाव का ?
"मुळा नदी पात्रावरील मानोरी, डिग्रस बंधारा दुरुस्तीसाठी निधी मात्र मांजरी,वांजुळपोई बंधाऱ्यांना एक ही रुपये निधी नाही,असा दुजाभाव का ? मंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना सारखा न्याय द्यावा."
नानासाहेब जुंधारे ( रासप जिल्हाध्यक्ष )
आरडगांव (प्रतिनिधी) राजेंद्र आढाव :
मुळा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीने बांधण्यात आलेले बंधारे दुरुस्तीसाठी मानोरी बंधारा पंचवीस लाख व डिग्रस बंधारा दहा लाख एकुण सुमारे 35 लाख रुपये खर्च केला जाणार आहे.मग मांजरी आणि वांजुळपोई बंधारा दुरुस्तीसाठी एकही रुपया निधी नाही, अशी दुटप्पी भूमिका का ? बंधारे भरून मिळावे म्हणून आम्ही पाटबंधारे विभाग व मंत्री महोदयांना निवेदन दिले.परंतु खालच्या भागातील बंधारे कोरडेच राहिले.ही सावत्र भूमिका योग्य नाही.सगळ्या बंधाऱ्यांसाठी सारखा न्याय दिला नाही.सदर निधीत मुळा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे झाली पाहिजेत.सर्व शेतकऱ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे रासप जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
0 टिप्पण्या