आरडगांव (प्रतिनिधी) : लोकसहभागातून साकारला सुमारे एक किलोमीटर अंतर असलेला आरडगाव-मानोरी शिवरस्ता. रस्त्याचे काम लोकसहभागातुन पूर्णत्वाकडे गेल्याने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
राहुरी तालुक्याच्या पुर्वभागातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आरडगांव-मानोरी शिवरस्ता हा मोरे वस्ती ते जाधव वस्ती (मुळा डावा कालवा)पर्यंत सुमारेअडीच किलोमीटर अंतराचा रस्ता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 40 लाख रुपये खर्च करून सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.तसेच उर्वरित पुढील एक किलोमीटर मुळा डावा कालव्या पर्यंत रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था होत असते.
त्यामुळे येथील शेतकरी अनिल इंगळे, दिलीप इंगळे, सुनिल जाधव,महेश शेळके,दिलीप जाधव, तुकाराम साळुंके,ज्ञानेश्वर जाधव,आण्णासाहेब सांळुके ,पोपट जाधव,मुरलीधर सांळुके भाऊसाहेब सांळुके,महिपती पिले, गंगाधर शिंदे,दत्तात्रय जाधव, गणेश साळुंके,सुभाष पिले, रमेश इंगळे, रंगनाथ ढेरे, महेश जाधव, प्रकाश सुर्यवंशी,कल्याण शेळके, जयंत जाधव,प्रदिप जाधव,नानासाहेब बारस्कर, धागुडे साहेब,संजय साळुंके,अंजाबापू आढाव ,रावसाहेब साळुंके आदी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्त्यावर कारगळ व त्यावर साधा मुरून टाकून रोलिंग करून दुरुस्तीचे काम सूर केले आहे. भविष्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहिलेला उर्वरित रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण करुन मिळावा अशी आपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या