तांभेरे येथे कृषी दुताकडून शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन

राहुरी प्रतिनिधी : श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड,संगमनेर या कॉलेजचा कृषी दूत विद्यार्थी विकास राजेंद्र पवार यांनी " ग्रामीण कृषी जागृती आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२२ " अंतर्गत तालुक्यातील तांभेरे येथे मातीपरीक्षण, बीजप्रक्रिया, चाऱ्यावरील प्रक्रिया, किटकनाशकांची माहिती व काळजीपूर्वक हाताळणी, पाचर कलम बसविणे, पिकांवरील रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवित मार्गदर्शन केले. 
     यावेळी कृषिदूताचे ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी स्वागत केले.यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.या कृषी कार्यक्रमामध्ये कृषी दूतास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कडलग, उपप्राचार्य डॉ.अरविंद हारदे,कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक तायडे,कार्यक्रमाधिकारी डॉ. नेहा काळे व सर्व विषय तज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या