१८ जूलैला रक्तदान शिबीर,कोवीड योद्धा सन्मानपञ वितरण - वाडेकर

राहुरी/प्रतिनिधी : शहरातील गोकुळ कॉलनी येथील योगा केंद्र येथे रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष चिंधे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पोखरणा,जेष्ठ पत्रकार सुभाष मुदळ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
     प्रेस संपादक व पञकार संघाचे राज्य अध्यक्ष डाॅ.डी.टी.आंबेगावे व जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या वतीने राहुरी तालुक्यात गेली दोन वर्षांपासून विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.करोना महामारीचे संकट अद्याप ही टळलेले नाही.या काळात रक्ताची गरज लक्षात घेता एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या वर्षभरात कोवीड काळात निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणा-या नागरीकांचा संघाचे सन्मानपञ देऊन गौरव तसेच प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या सदस्यांना विमा प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

"राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने रविवार १८ जूलैला रक्तदान 
शिबीर,कोवीड योद्धा सन्मानपञ वितरण तसेच संघातील पत्रकारांना विमा पाॅलिसी वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी दिली."

     या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष राजेंद्र वाडेकर उपाध्यक्ष रमेश बोरुडे,उपाध्यक्ष मनोज साळवे सचिव सुभाष आग्रे तालुका कार्याध्यक्ष दिपक दातीर,सह सचिव अशोक मंडलीक,प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब भोसले,संतोष जाधव,खजिनदार कमलेश विधाटे,मधुकर म्हसे,सतीश फुलसौदर,मिनाष पटेकर,राजेंद्र म्हसे,आप्पासाहेब घोलप,सचिन ठुबे,राजेंद्र पवार,रहेमान शेख,समीर शेख,आर.आर.जाधव,शरद खिलारी,सुनिल सात्रळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या