" देवळाली प्रवरा नगरपालिका आणि मंडलाधिकारी यांचेकडून घटनेची माहिती घेऊन पंचनामे आणि मदती संदर्भात पुढील कार्यवाही करणेत येईल."
- फसीयोद्दीन शेख ( तहसीलदार राहुरी )
राहुरी - देवळाली प्रवरा मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने टीमचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, राहुल महांकाळ यांनी राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना भेटून निवेदन दिले.
दि. ११ जुलै २०२१ रोजी देवळाली प्रवरा हद्दीत तब्बल ७२ मी.मी. पाऊस पडला. देवळाली प्रवरा हद्दीतील शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. तसेच नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरातील धान्य, खते व इतर संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे. सबब महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळणेची कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन आज देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना दिले. या प्रसंगी टीमचे सदस्य आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अनिस शेख, राहुल महांकाळ आदीं उपस्थित होते.
0 टिप्पण्या