उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी वसईकर

नंदुरबार : येथील नंदलाल वसईकर यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी नंदलाल वसईकर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे .
       नंदलाल वसईकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनीताई पाटील,पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय तांबे, खान्देश प्रमुख संदीप सोनवणे, नंदुरबार जिल्हा प्रमुख चंद्रकांत लिंगायत, जळगाव जिल्हा प्रमुख प्रदीप पवार आदींनी अभिनंदन केले आहे. चंद्रकांत लिंगायत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या