राहुरी : श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या जागतिक कृषी महोत्सव २०२१ अंतर्गत कोंढवड सेवा केंद्राच्या वतीने रविवारी एकदिवसीय कृषीचा जनजागर आयोजित करण्यात आला होता.
माती,शेती अवजारांची पूजा करून एकदिवसीय कृषी जनजागराची सुरुवात करण्यात आली. या महोत्सवात कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, दुर्मीळ वनौषधी प्रदर्शन, देशी पशु गोवंश माहिती,किटकनाशकांचे दुष्परिणाम, सेंद्रिय शेती विषयक, व्यवसाय व सेवेकर्यांच्या विविध प्रश्नोत्तरे यावर मार्गदर्शन करण्यात आले.जागतिक कृषी महोत्सवात सह्याद्री कृषीरत्न पुरस्कार प्राप्त मेजर ताराचंद गागरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे,माजी सरपंच प्रभाकर म्हसे,स्वामी समर्थ मार्गाचे राहुरी तालुका प्रतिनिधी सतिश इंगळे,क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे,गोरक्षनाथ माळवदे,इंद्रभान म्हसे,गोरक्षनाथ म्हसे,महेश हिवाळे,निलेश हापसे,सुनिल हिवाळे,राजु पेरणे,राहुल हिवाळे,अमोल म्हसे, महेश ढोकणे,संजय म्हसे, गायकवाड काका,भाऊसाहेब पवार,गणेश भोईटे, शिवदत्त म्हसे यांसह शेतकरी व महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन गोरक्षनाथ माळवदे व आभार प्रदर्शन अमोल म्हसे यांनी केले.
0 टिप्पण्या