संगमनेर : निळवंडे पाटाचे काम करत असताना संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रवरा नदीवरून आणलेल्या पाईप लाईन तोडल्या गेल्या आहे. या पाईप लाईन पुन्हा दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,यासाठी आज संगमनेर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले असता त्यांची भेट घेत अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांनी मागणीचेे निवेदन दिले आहे.
प्रवरा नदीपात्रातुन शेतकऱ्यांनी गट तयार करून शेतीसाठी पाण्याच्या पाईपलाईन आणलेल्या आहे. मात्र निळवंडेच्या पाटाचे काम सुरु झाल्यानंतर त्या तोडल्या गेल्या. या पाईप लाईन जोडणीसाठी शेतकऱ्यांना सध्या एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत आहे.तोडलेल्या पाईप लाईन दुरुस्ती साठी संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही.अगोदरच कर्ज काढून असंख्य अडथळे पार करत शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी आणण्यासाठी पाइपलाइन केल्या होत्या. त्यात शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्यात तोडलेल्या पाईप लाइन दुरुस्तीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देऊन हा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देत केली आहे. यावेळी क्रांतिसेनेचे युवकचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष इंजि. युवराज सातपुते,तालुका अध्यक्ष अमित कोल्हे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर व शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या