राहुरी: राहुरी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचार्यांनी फिटनेस सर्टिफिकेट च्या नावावर स्थलांतरित होणार्या नागरिकांकडुन प्रतिव्यक्ती १०० रु. कुठलीही पावती न बनवता घेउन सरकारचा रूग्णालयाकडुन महसुल बुडविला जात आहे तसेच राहुरी ग्रामीण रूग्णालयात सोशल डिस्टेंसींगचा फज्जा उडाला आहे, स्थलांतरित नागरिकांची तपासणी करतानी कामात हलगर्जीपणा केल्याने त्वरीत डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेल द्वारे अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी केली आहे.
राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आज लाॅकडाऊनला महिना झाला तरी सुद्धा सोशल डिस्टेंसींगचा फज्जा उडालेला दिसतोय.अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यात कोरोना ग्रस्त रुग्ण आढळला तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज लाॅकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थीक परिस्थिती ढसाळलेली असल्याने राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉ व तेथील कर्मचार्यांनी फिटनेस सर्टिफिकेट च्या नावावर स्थलांतरित होणार्या नागरिकांकडुन प्रतिव्यक्ती १००/- रु. कुठलीही पावती न बनवता घेउन सरकारचा महसुल बुडविल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर ग्रामीण रुग्णालयांकडुन स्थलांतरित होणार्या नागरिकांकडुन कुठलेही शुल्क आकारले जात नसतांना राहुरी ग्रामीण रुग्णालय का आकारत आहे याची चौकशी करण्यात यावी. तपासणीस गेल्यानंतर रूग्णाचा BP चेक न करताच अंदाजे लिघुन दिला. इतर काळातही ग्रामीण रुग्णालयात डॉ हजर नसणे, योग्य ट्रीटमेंट मिळत नसल्याचे शासनाकडे अनेक तक्रारी असतील परंतु आज देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाही कामात हलगर्जीपणा केल्याने, शासनाचा महसुल बुडविल्याने, सोशल डिस्टेंसींगचा नियम पाळत नसल्याने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ व सह कर्मचार्यांना कायदेशीर कारवाई करुन बडतर्फ करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या