"११ मे महात्मा दिन" सोशल डीस्टन्स ठेऊन समाजोपयोगी उपक्रम राबवुन आदर्श निर्माण करावा- सचिन भाऊसाहेब गुलदगड
"महात्मा दिन ११ मे"
नगर - दि. ११ मे १८८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ज्योतीबा फुलेंना "महात्मा" ही पदवी प्रदान केली.
आणि त्यामुळेच आपण सर्व जन महात्मा जोतिबा फुले असे उच्चार करतो.,,वा जोतिबा फुले यांच्या नावापुढे महात्मा हि पदवी लावतो. त्यामुळेच (२०१६) या वर्षांपासुन ११ मे हा दिवस
" महात्मा दिन "
म्हणून साजरा व्हावा यासाठी श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यने प्रयत्न सुरु केले आहेत,आपण सगळे फुलेप्रेमी मिळुन यासाठी लवकरच या विषयावर जनआंदोलन उभारुयात.पन सुरुवात हि स्वतः पासुन केली पाहीजे,तेव्हाच आपण दुसर्यांना सांगु शकतो..त्यामुळेच या येत्या ११ मे २०२० रोजी सर्व फुलेप्रेमींनी व फुले दाम्पत्याच्या विचारावर जिवन व्यतीत करणार्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करुन तसेच महात्मा दिनानिमित्त फुले दाम्पत्यांचे विचार जनमाणसात पोहचविण्याचे कार्य करुन...
"महात्मा दिन" साजरा करावा.
मिञांनो..आपण सर्वजन "महात्मा दिन" साजरा करनारच आहोत,ईतरानांही साजरा करायला सांगुयात व महात्मा दिनाचे महत्त्व पटवुन देऊयात ..
(आपआपल्या भागातील तहसिलला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन व्यापक स्वरुपात व प्रशासकीय स्तरावर "महात्मा दिन" साजरा होण्यासाठी प्रयत्न करुयात) असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघातर्फे संघाचे संस्थापक, अध्यक्ष महाराष्ट्र भुषण लोकनेते श्री सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले.
पुढे बोलताना गुलदगड म्हनाले कि फुलेप्रेमींनी आप आपल्या घरी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कांदबरी, त्यांचे लिखाण वाचून उदा. शेतकऱयांचे आसूड, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, सत्यधर्म पुस्तिका, छत्रपती शिवरायांचा पवाडा, त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन साजरा करा.
संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर ज्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून हाहाकार झाला आहे, कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे सरकारने जे निर्देश दिले आहेत त्याचे सर्वांनी पालन करा, जरुरी असेल तरच घरा बाहेर निघा, 1 मीटर अंतर ठेवा, NOSE मास्क चा वापर करा, हात स्वच्छ धुवा,सर्वांनी राज्य व केंद्र सरकारने केलेले आव्हान तसेच लागू केलेले आदेश, निर्देश, लोकडाऊन याचे पालन करा..
तसेच यासाठी होणारा खर्च, आपण करणारा खर्च न करता संपूर्ण देशावर आलेल्या ह्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधा व समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करावा, महात्मा दिनानिमित्त गोरगरीब जनतेची सेवा करावी, कोरोना काळात आपनही समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजे या हेतुने "महात्मा दिन" साजरा करावा,असे आवाहन यावेळी गुलदगड यांनी केले.
0 टिप्पण्या