रिक्षा चालक-मालक यांना विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना औरंगाबाद शहर अध्यक्ष मनोहर निकम पाटील यांनी केली आहे.
औरंगाबाद : कोरोना व्हायरस मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा चालक-मालक यांना मदत म्हणून विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या ई-मेल द्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,जगावर आलेले कोरोनाचे संकट पाहता यात सर्वजण होरपळून निघत आहे.महाराष्ट्रातही याची भीती क्लेशदायक आहे.यातून सुटका व्हावी म्हणून सरकारने लॉक डाऊन ची घोषणा केली,ती स्वागतार्हच आहे. पण त्यामुळे असंख्य मोलमजुरी,कारागीर या वर्गात मोडणारे यांची मोठी कुचंबणा झालेली आढळून येते आहे, त्यातल्या त्यात रिक्षा चालक-मालक यांचा प्रश्न मोठा बिकट झालेला आहे.म्हणून अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मा.प्रा.संतोषजी तांबेसाहेब व प्रदेशसरचिटनिस नितीनभैया देशमुख यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली अ. भा.क्रांतिसेना प्रणित ऑटो युनियन च्या माध्यमातून आपणास हे निवेदन सादर करण्यात येत आहे.लॉकडाऊनमुळे सर्व रिक्षा या जागच्या जागी उभ्या असून त्यामुळे यावर अवलंबून असणारे चालक-मालक व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वहाचा प्रश्न उभा राहिला आहे,रिक्षा चालक-मालक हे सर्वस्वी त्यांच्या रोजदंरीतुन झालेल्या कमाईतूनच घर चालवून त्यांची कर्जाची हप्ते फेडीत असतात हे सर्वश्रुत आहे.परंतु लॉकडाऊन मुळे या वर्गाची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून परिणामतः त्यांची घरभाडे,कर्ज काढून घेतलेल्या रिक्षांचे हप्ते हे तर थांबलेच असून सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने मा.मुख्यमंत्री व राज्य सरकारने रिक्षा चालक-मालक यांचा सकारात्मक विचार करून कल्याणकारी महामंडळाच्या मार्फत विशेष निधी उपलब्ध करून देऊन तो रिक्षा चालक-मालकापर्यंत थेट पोहचता होईल ही व्यवस्था करावी व या हातावर पोट असणाऱ्या व राज्यभर स्वव्यवसाय करून आपलं आयुष्यशी दोन हात करीत राहणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार देऊन या कोंडीतून सावरण्याचा प्रयत्न करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या