फिरते शिवभोजन व्यवस्था करण्याची अखिल भारतीय क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पैठण
कोरोना व्हायरस च्या अनुषंगाने महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात  संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडल्यास पोलिस प्रशासनाकडुन विचारपुस न करता मारहाण केली जात असल्याने गरीब व हातावर काम करणाऱ्या नागरिकांना शिवभोजन योजनेचा लाभ घेता येत नसल्याने फिरते शिवभोजन व्यवस्था करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील व सरचिटणीस नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई-मेल व ट्विट द्वारे केली आहे.
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाचा सामना करण्यासाठी आपले सरकार चांगले काम करत आहे.परंतु १४ तारखेपर्यंत लाॅकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी खाणावळ बंद पडल्याने विद्यार्थी, प्रवासी, बॅचलर कामगार ,लाॅकडाउन चा फटका बसलेले गरीब नागरिक उपाशीपोटी राहत आहे.हे अडचणीत आलेले नागरिक घराच्या बाहेर पडु शकत नसल्याने शिवभोजन योजनेद्वारे गरीब व अडचणीत सापडलेल्या नागरीकांना जेवण मिळावे. या हेतुने फिरते शिवभोजन व्यवस्था ही संकल्पना फायदेशीर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.यासाठी प्रत्येक तालुकानिहाय फिरते शिवभोजनाची व्यवस्था करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या