बोधराज प्रतीष्ठाण,क्रांतीसेनेतर्फे गुणवंताचा सन्मान

बंकलगी:_२०— आज एकादशी पावन दीनी बोधराज प्रतिष्ठाण व अ.भा.क्रांतीसेना सोलापुर यांचे तर्फे दै.लोकमतचे मल्लीकार्जुन पानगाव यांना आदर्श पत्रकारीता पुरस्कार व कु.श्रावणी पवार हीला विशेष प्रावीण्य पुरस्काराने सन्मानीत करणेत आले.

 समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवुन त्यांना अध्यात्मीकतेची जोड देत समाजप्रबोधन करणारे बोधराज प्रतीष्ठान बंकलगी संस्थापक व क्रांतीसेना जिल्हा अध्यक्ष दीपकआबा पाटील,अध्यक्ष सुनीलभाऊ देशमुख,लक्ष्मण मदभावी आदींच्या हस्ते दै.लोकमतचे प्रशासकीय अधिकारी श्री.मल्लीकार्जुन महादेव पानगाव यांना त्यांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल,प्रेमभावनेने त्यांना आदर्श पत्रकारीता पुरस्कार देवुन गौरवणेत आले. तसेच शालेय स्तरावरील धावणे,भाषणस्पर्धा व सुगम गायन स्पर्धेत उल्लेखनीय असे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेबद्दल कु.श्रावनी संतोष पवार या विद्यार्थींनीचा विषेश प्राविण्य पुरस्कार देवुन गौरवणेत आले.
 कार्यक्रमास प्रमुख अतीथी भालचंद्र सुतार गूरुजी,गुलाब पाटील सर,वसंतराव पाटील सर,आदर्श अॅकॅडमीचे अमोल बनसोडे सर,प्राणीमित्रचे मल्लु धुळखेडे,पिंटु बनसोडे,संतोष पवार,पदमीनी देशमुख,गोकुळा शिंदे,जयश्री नीळ,पल्लवी शिंदे,राधा देशमुख,वैभव देशमुख,सादेपुरचे गजानन राजपुत आदी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या