आदर्श अॅकॅडमीचे आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान
बंकलगी.._२०_ आज प्रथमच आदर्श अॅकॅडमी,प्राणीमीत्र संघटना व समता मीत्र मंडळ यांचे संयुक्तरीत्या समाजातील विवीध क्षेत्रातील चार मान्यवरांचा "आदर्श समाज रत्न पुरस्कार" देवुन सन्मानीत करणेत आले.
आपले अविरत रुग्णसेवेबद्दल डाॅ.विवेक पाटील यांचा सन्मान कीरण सुर्वे व अमोल बनसोडे सर सुतार गूरुजी यांचे हस्ते करणेत आला.बोधराज प्रतिष्ठाणचे संस्थापक व क्रांतीसेनेचे शेतकरी युवानेते दीपकआबा पाटील यांना कृषी,सामाजिक अध्यात्मीक क्षेत्रातील कार्याबद्दल "आदर्श समाजरत्न पुरस्कार "प्राणीमीत्र मल्लु धुळखेडे श्रीकांत बनसोडे यांचे हस्ते देणेत आला.बोधराजचे अध्यक्ष,भक्ती संप्रदायातील मार्गदर्शक सुनिलभाऊ देशमुख यांना अध्यात्मीक सामाजीक क्षैत्रातील कार्यामुळे "आदर्श समाज रत्न पुरस्कार" देणेत आला.कृषिक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श पालक श्री.संतोष पवार यांनाही "आदर्श समाज रत्न पुरस्कार" देवुन गौरविणेत आले.
कार्यक्रमास सुरुवातीला मा.अमोल बनसोडे सरांनी प्रास्तविक करत मान्यवरांची निवड त्यांची माहीती सांगितली.सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली.मा.गुलाब पाटील सर व भालचंद्र सुतार गुरुजींनी बनसोडे सर व सर्व युवा मंडळाचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले व सर्व पुरस्कार प्राप्त मंडळीचे अभिनंदन केले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी बागायतदार लक्ष्मण मदभावी,मल्लु धुळखेडे,सुतार गुरुजी,वसंतराव पाटील,गोकुळा शिंदे,जयश्री नीळ,श्रावणी पवार,ऊज्वला देशमुख,वैभव देशमुख ,मल्लु बनसोडे आदी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या