कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क,हॅन्ड सेनिटायजर मोफत द्या.

मास्क व हॅन्ड सेनिटायजर नागरिकांना मोफत देेण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले,परभणी जिल्हा अध्यक्ष गोंंविद इक्कर.
परभणी प्रतिनिधी :
      कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व हॅन्ड सेनिटायजर नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या परभणी येथील पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
     संपुर्ण जगभरामध्ये नुकतेच १२ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना ( COVID-19 ) या आजाराला जागतिक महामारी म्हणुन घोषित केले आहे.या महामारीचा परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्रात व संपूर्ण देशभर या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महामारी रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व हॅन्ड सेनिटायजर नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. या मागणीचे निवेदन देताना मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर,स्वप्नील गरूड, रोहित कदम,करणं खणे,सुरज भोसले,शिवाजी तोलमारे, विशाल कदम, मुकुंद इक्कर,पवन ठाकुर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या